आता ड्रीम-11 नाही... आशिया चषकात टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार नवीन नाव, कारण...
आता ड्रीम-11 नाही... आशिया चषकात टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार नवीन नाव, कारण...
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : ऑनलाईनं गेमिंगसंदर्भात एक महत्त्वाचं विधेयक गुरुवारी संसदेत मांडण्यात आलं. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक संसदेत मांडलं. गेल्या काही वर्षात ऑनलाईन गेमिंगमुळे आर्थिक नुकसान तसंच मानसिक तणाव वाढल्यानं अनेक घटना समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं. या ऑनलाईन गेमिंगमुळे एकट्या कर्नाटक राज्यात मागील अडीच वर्षात 32 आत्महत्या झाल्याचं समोर आलं आहे. राज्यसभेत मंजूर झालेले ऑनलाइन गेमिंगचे प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल 2025, राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर अशा व्यवसायांना बेकायदेशीर ठरवेल. 

हे ही वाचा 

संसदेत ऑनलाईन गेमिंगबाबत विधेयक मंजूर होताच अनेक गेम्सने रिअल-मनी गेम्स थांबवलेत. दरम्यान या विधेयकामुळे ड्रीम-11, रमी, पोकरसारखे ऑनलाईन गेमही बंद झाले आहेत. पैशांचा समावेश असलेल्या ऑनलाईन गेमिंगमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे. ऑनलाईन गेमिंगमुळे काहींनी आत्महत्या केल्याचंही केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमिंग बंद करण्याबाबत विधेयक मांडण्यात आले. विधेयक मंजूर झाल्यानंतर काही दिवसांतच ड्रीम 11 ने बीसीसीआयसोबतचा प्रायोजकत्व करार संपवला आहे.

हे ही वाचा 
मनोज बाजपेयींच्या नव्या वेब सीरिजमध्ये झळकणार ‘हा’ मराठी कलाकार; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये कमावलंय मोठं नाव

सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आलेली ड्रीम-11 गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्येही सक्रिय झाली होती आणि परिणामी 2023 मध्ये ड्रीम-11 ने बीसीसीआयसोबत 358 कोटी रुपयांचा करार केला. या करारामुळे ही कंपनी भारतीय क्रिकेट संघाची टायटल प्रायोजक बनली आणि तेव्हापासून टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम-11 चे नाव लिहिले गेले आहे. हा करार 3 वर्षांसाठी होता जो 2026 मध्ये संपणार आहे. पण त्याआधीही हे विधेयक मंजूर झाल्यामुळे ड्रीम इलेव्हनने टीम इंडियाचं प्रायोजकत्व काढलं आहे. परंतु आता ऑनलाईन गेमिंगबाबत विधेयकानंतर ड्रीम 11 ला मोठा फटका बसणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group