मनोज बाजपेयींच्या नव्या वेब सीरिजमध्ये झळकणार ‘हा’ मराठी कलाकार; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये कमावलंय मोठं नाव
मनोज बाजपेयींच्या नव्या वेब सीरिजमध्ये झळकणार ‘हा’ मराठी कलाकार; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये कमावलंय मोठं नाव
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : मराठी कलाकार आणि मराठी चित्रपट कोनापेक्षा कमी नाही हे कलाकारांनी , निर्मात्यांनी अनेकदा दाखवून दिलेलं आहे. मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी आपल्या मराठी इंडस्ट्रीसह हिंदी तसेच दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता ओंकार राऊत आता बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयीसह काम करण्यास सज्ज झाला आहे. 

हे ही वाचा 
न्यायालयातच सरकारी वकिलाची आत्महत्या ; 'या' गोष्टीने मृत्यूचं गूढ उलगडणार !

लवकरच नेटफ्लिक्सवर ‘इनस्पेक्टर झेंडे’ ही नवीन सीरिज प्रदर्शित होणार आहे. लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘इनस्पेक्टर झेंडे’ या सीरिजमध्ये हरिश दुधाडे, गिरीजा ओक, भाऊ कदम, सचिन खेडेकर असे मराठी कलाकार एकत्र झळकणार आहेत. याशिवाय पोस्टरवर मागे आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हा अभिनेता म्हणजेच ओंकार राऊत.

हे ही वाचा 
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी व्हिडीओ काढत म्हणाले...

 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमात ओंकार राऊतने मोठं नाव कमावलं आहे. ही मोठी संधी मिळाल्याबद्दल अभिनेत्याने पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. ही वेब सीरिज ५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group