प्रेक्षकांनी Family Man या सीरिजला अक्षरश डोक्यात उचलून घेतलेले आहे. सस्पेंस, थ्रिल फॅमिली इमोशन्स आणि शेवटी वेगळाच ट्विस्ट यामुळे या सीरिजच्या पहिल्या भागांनी प्रेक्षकांच्या घरात हक्क्काचं घर केलय. या दोन सीरिजच्या मोठ्या प्रसिद्धीमुळे उत्तम अभिनय आणि दिग्दर्शन , कथा यामुळे या सीरिजच्या तिसऱ्या मोठ्या अपेक्षा प्रेक्षक करत आहे.
Raj,DK, suman kumar नं सीरिज कमाल पद्धतीनं लिहिलीय आणि त्यांनी tusshar seyth सोबत दिग्दर्शित केलीय आणि तिचं काम इमानदार आणि प्रभावी आहे. प्रत्येक सीन, पात्र आपली वेगळी छाप सोडतं. 'फॅमिली मॅन 3' मध्ये नेमकं काय याची थोडक्यात माहिती जाणून घ्या.
'फॅमिली मॅन 3' सीरिजची कहाणी काय?
श्रीकांत तिवारी यावेळी नॉर्थ ईस्टकडच्या मिशनवर जातो, पण असं काहीतरी घडतं, ज्यामुळे त्याला स्वतःलाच वॉन्टेड व्हावं लागतं. आता त्याच्या कुटुंबाचं काय होईल? यावेळी, कथा नॉर्थ ईस्टकडून थेट देशाच्या बाहेरपर्यंत जाते. ही वेब सीरिज Amazon Prime Video वर 45 मिनटांच्या 7 एपिसोडमध्ये पाहू शकता.
ही एक जबरदस्त सीरिज आहे, जी तुम्हाला पहिल्या फ्रेमपासूनच खिळवून ठेवते. यामध्ये फॅमिली सीन्स आहेत. मनोज बाजपेयी आणि जयदीप अहलावत दोघांचा प्रत्येक सीन कमाल आहे. ही सीरिज तुम्ही सुरू केली, तर पूर्ण संपवल्याशिवाय तुम्ही थांबणार नाही, हे नक्की. सस्पेंस, थ्रिल आणि ह्यूमरचं असं कमाल कॉम्बिनेशन दिसतं, जे तुम्हाला हादरवून सोडतं.
मनोज बाजपेयीचं काम दमदार आहे, त्याचे एक्सप्रेशन्स कमालच आहेत, त्यानं एका एजंट आणि 'फॅमिली मॅन'च्या आयुष्यातील समस्या अगदी ठळकपणे दाखवल्या आहेत. जयदीप अहलावतचे सीन्स इतके जबरदस्त आहेत की, तुम्ही रिवाइंड करुन पुन्हा पुन्हा पाहाल. इथे निमरत कौरनं सर्वांची मनं जिंकलीत. एका सीनमध्ये जयदीप काहीतरी उलटं बोलतं पण, तिनं जे उत्तर दिलंय त्यावरुन स्पष्ट दिसतंय की, ती कमाल अभिनेत्री आहे. Priyamani चं कामंही उत्तम आहे. अश्लेषा ठाकूर, गुल पनाग आणि वेदांत सिन्हाही यामध्ये आपली छाप सोडतात.