सोशल मीडियावर सध्या माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास आणि वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती अहलावत यांच्या अफेअरच्या बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. असे म्हटले जात आहे की, काही महिन्यांपूर्वी सहवाग आणि आरती यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते. अनेक मीडिया अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की, दोघेही गेल्या काही काळापासून वेगळे राहत आहेत आणि लवकरच त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. दरम्यान, आरतीचा माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हाससोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.

बाॅलिवूडपासून ते क्रिकेटपटूपर्यंत आता लग्नानंतरही लफडी असणे सामान्य गोष्ट झाली आहे. गेल्या काही काळापासून, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागची पत्नी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करणार असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. सेहवागची पत्नी आरतीचे सध्या माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास यांच्याशी संबंध जोडले जात आहेत आणि असे म्हटले जात आहे की दोघेही डेटिंग करत आहेत.
हे दोघे प्रत्यक्षात रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा त्यांनी केलेली नाही. घटस्फोट आणि डेटिंगच्या अफवांमध्ये, मिथुन आणि आरती एकत्र दाखवणारा एक जुना फोटो समोर आला आहे. या फोटोमुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. वीरेंद्र सेहवागने अद्याप या अफवांच्या डेटिंगवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मिथुन आणि आरतीचा हा जुना फोटो 2021 चा आहे.