मोठी बातमी :
मोठी बातमी : "या" भारतीय क्रिकेटपटूचा भीषण अपघात , रुग्णालयात दाखल
img
Dipali Ghadwaje
इराणी चषकाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबईच्या संघाला मोठा झटका बसला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाचा भाग असलेला मुशीर खान स्पर्धेबाहेर होण्याची दाट शक्यता आहे. कानपूरहून लखनौकडे जात असताना मुशीरच्या वाहनाला अपघात झाला. अपघातावेळी मुशीरसोबत त्याचे वडील तथा प्रशिक्षक नौशाद खान हे देखील होते. मुशीरचा मोठा भाऊ सर्फराज खानने भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 

मेदांता हॉस्पिटलने मुशीरच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले की, मुशीरला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे पण सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले की, २७ सप्टेंबर रोजी मुशीर खानच्या वाहनाचा अपघात झाला. पूर्वांचल एक्सप्रेसवरुन प्रवास करत असताना ही घटना घडली. त्याच्या मानेला दुखापत झाली आहे. 

आमचे वरिष्ठ डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर आहे. १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान मुंबई संघ शेष भारत संघाविरुद्ध इराणी चषकासाठी भिडेल. तसेच मुशीरची तब्येत ठीक असून, प्रवासासाठी योग्य झाल्यावर पुढील मदतीसाठी त्याला मुंबईला नेण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group