क्रिकेटवेडे असाल आणि स्मृती मानधनाला ओळखत नसाल असे होऊच शकत नाही. स्मृती मानधना अनेकांची आदर्श आहे तर अनेकांची क्रश देखील आहे. क्रिकेटमधील तिचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आता भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना लवकरच आपली लग्नगाठ बांधणार आहे.
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छलसोबत स्मृती मानधना लग्न करणार आहे. पण स्मृतीचा नवरा पलाश मुच्छल नेमका आहे कोण? तो करतो काय ? त्याचं वय किती? त्याची एकूण संपत्ती किती? स्मृती आणि पलाश यांच्यात जास्त श्रीमंत कोण? यांसारख्या अनेक चर्चा रंगल्यात.
पलाश मुच्छल कोण?
स्मृती मानधना 2019 पासून म्युझिक कंपोजर आणि फिल्म मेकर पलाश मुच्छलला डेट करतेय. पलाश मुच्छलनं 2014 च्या 'ढिश्कियाऊं' सिनेमातून पदार्पण केलं. त्यांनी भूतनाथ रिटर्न्ससाठी संगीत देखील दिलंय. त्याचं प्रसिद्ध गाणं 'पार्टी तो बनती है' खूप लोकप्रिय आहे. याशिवाय, 'तू ही है आशिकी' हे गाणं देखील चाहत्यांचं आवडतं गाणं आहे.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील वयाच्या फरकाबद्दल बोलायचं तर पलाशचा जन्म 22 मे 1995 रोजी झाला होता, तर स्मृती मानधना यांचा जन्म 18 जुलै 1996 रोजी झाला होता. यामुळे पलाश स्मृतीपेक्षा एक वर्ष आणि तीन महिनांनी मोठा आहे. बहीण पलक मुच्छल ही देखील बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका आहे. तिनं सलमान खानच्या 'किक'सह अनेक हिट चित्रपटांना आवाज दिला आहे.