वैभव सूर्यवंशीची १७५ धावांची ऐतिहासिक खेळी,  ५ वर्ल्ड रेकॉर्ड्स नावावर
वैभव सूर्यवंशीची १७५ धावांची ऐतिहासिक खेळी, ५ वर्ल्ड रेकॉर्ड्स नावावर
img
वैष्णवी सांगळे
भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याने ऐतिहासिक शतकी खेळी केली आहे.  भारतीय क्रिकेटमधील उगवता सितारा म्हणून पाहिलं जात असलेल्या वैभव सूर्यवंशी याने अंतिम लढतीत आपल्या घणाघाती फलंदाजीचं दर्शन घडवलं. 

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर वैभवने सुरुवातीपासूनच षटकार, चौकारांची बरसात करत शतकी खेळी साकारली. त्याने अवघ्या ५५ चेंडूत १०० धावा कुटून काढत नवा इतिहास रचला. वैभव हा १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत शतकी खेळी करणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला . 


वैभवने या सामन्यात संयमी सुरुवात करत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर वैभवने गिअर बदलत पाहता पाहता शतक आणि दीडशतक केलं. त्यामुळे वैभवकडे द्विशतक करण्याची संधी होती. मात्र वैभवचं द्विशतक अवघ्या २५ धावांनी हुकलं. वैभव १७५ धावांवर बाद झाला. वैभवने ७२ बॉलमध्ये दीडशतक पूर्ण केलं. त्यामुळे वैभव सहज द्विशतक करेल, असं चित्र होतं. मात्र वैभव दीडशतकानंतर आणखी काही धावा जोडून आऊट झाला.

वैभवने 80 बॉलमध्ये 15 सिक्स आणि 15 फोरसह 80 बॉलमध्ये एकूण 175 रन्स केल्या. वैभवने 218.75 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.  वैभवने या खेळीसह तब्बल ५ वर्ल्ड रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. वैभवने नक्की काय काय विक्रम केले? 

वैभवचे 5 वर्ल्ड वर्ल्ड रेकॉर्ड्स
१) वैभव सूर्यवंशी याने आयपीएलनंतर अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ऐतिहासिक कामगिरी केली. वैभव अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला.

२) वैभव सूर्यवंशी याने 55 चेंडूत शतक पूर्ण केलं. वैभव यासह अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत वेगवान शतक करणारा फलंदाज ठरला.

३) वैभव अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला.

४) वैभवने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज हा बहुमान मिळवला.

५) वैभवने या खेळीसह षटकारांचं शतकही पूर्ण केलं. वैभव अंडर 19 वनडे क्रिकेटमध्ये 100 शतकं झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.

वैभव अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात शतक करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. वैभवआधी उनमुक्त चंद आणि मनजोत कालरा या दोघांनी शतक झळकावलेलं. मात्र वैभवने दोघांच्या तुलनेत वेगवान शतक झळकावलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group