पोटदुखीचा त्रास, महिला डॉक्टरकडे गेली, डॉक्टरांनी महिलेला तपासलं अन् गर्भपिशवीत भयंकर दिसलं
पोटदुखीचा त्रास, महिला डॉक्टरकडे गेली, डॉक्टरांनी महिलेला तपासलं अन् गर्भपिशवीत भयंकर दिसलं
img
वैष्णवी सांगळे
छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा रुग्णालयात एक अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ४८ वर्षीय महिलेला वाचवलं आहे. पोटदुखीचा त्रास होत असल्याने ही महिला डॉक्टरकडे गेली मात्र डॉक्टरने तिला तपासताच डॉक्टरांनाही मोठा धक्का बसला. 

नेमकं प्रकरण काय ?
४८ वर्षीय महिला काही दिवसांपासून सतत रक्तस्राव, पोटात गोळा जाणवणे आणि झपाट्याने कमी होत असलेले हिमोग्लोबिन अशा गंभीर तक्रारी घेऊन छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तपासणीदरम्यान तिच्या गर्भाशयात अनेक मोठ्या गाठी असल्याचे स्पष्ट झाले होते. साधारणपणे 60 ते 80 ग्रॅम वजनाची गर्भपिशवी आणि त्याच गर्भपिशवीत असणाऱ्या 2 किलो वजनाच्या सात गाठी बाहेर काढण्यात आल्या. 

महिलांमध्ये सध्या गर्भपिशवीच्या संदर्भातील आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत असून, त्यातून गंभीर आणि गुंतागुंतीची वैद्यकीय स्थिती निर्माण होते. ‎सदर महिला काही दिवसांपासून सतत रक्तस्राव, पोटात गोळा जाणवणे आणि झपाट्याने कमी होत असलेले हिमोग्लोबिन अशा गंभीर तक्रारी घेऊन जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तपासणीदरम्यान तिच्या गर्भाशयात अनेक मोठ्या गाठी असल्याचे स्पष्ट झाले होते.

शस्त्रक्रियेदरम्यान साधारण 60 ग्रॅम वजनाच्या गर्भपिशवीतून सात मोठ्या गाठी काढण्यात आल्या, ज्यांचे एकत्रित वजन दोन किलो होते. एवढ्या लहान अवयवामध्ये इतक्या मोठ्या गाठी असल्याने गर्भाशयाचा आकार आणि अंतर्गत रचना पूर्णतः बदलली होती, त्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि कौशल्याची कसोटी पाहणारी ठरली.‎शस्त्रक्रियेनंतर संबंधित महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून, तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group