माता न तू वैरिणी ! नवजात बाळाला पोत्यात गुंडाळलं आणि...
माता न तू वैरिणी ! नवजात बाळाला पोत्यात गुंडाळलं आणि...
img
वैष्णवी सांगळे
छत्रपती संभाजीनगर शहरात मातृत्वाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पतीपासून विभक्त झालेल्या २४ वर्षीय तरुणीने अनैतिक संबंधातून झालेल्या गर्भधारणेनंतर बाळाला जन्म दिला आणि कुटुंबाला कळू नये म्हणून त्याच बाळाला पोत्यात टाकून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले. 

नाशिक : 'याठिकाणी' एक दिवसाचे अर्भक आढळल्याने खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, माता ही मूळची वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचा विवाह झाला होता, मात्र पतीसोबत पटत नसल्याने त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर ती छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगरात राहू लागली आणि एका खाजगी कंपनीत नोकरी करू लागली.  पुढे अनैतिक संबंधातून ती गर्भवती राहिली, कुटुंबापासून गर्भधारणा लपवण्यासाठी ती आपल्या गावी गेली आणि बाळाला जन्म दिला.

ग्रामसभेत तुंबळ हाणामारी; रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांवरून वाद

कुटुंबाच्या भीतीने तिने स्वतःच्या हाताने नवजात बाळाला पोत्यात भरून पुन्हा छत्रपती संभाजीनगरात येत डिव्हायडरवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिले. मोकाट कुत्र्यांनी ते पोतं ढिगाऱ्यातून बाहेर काढून रस्त्यावर आणले. याच वेळी कडा कार्यालयात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले भाग्येश पुसदेकर रस्त्याने जात होते. त्यांना पोत्यातून बाळाचा रडण्याचा आवाज आला. 

भाजपाला मोठा धक्का ! बड्या नेत्याचा राजीनामा

क्षणाचाही विलंब न करता त्यांनी नागरिकांच्या मदतीने पोत उघडून बाळाला बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्ही तपासात महिलेला ताब्यात घेतले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group