रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व जवानांना तीन कोटींचा गंडा; नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व जवानांना तीन कोटींचा गंडा; नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
img
Chandrakant Barve

नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- शेअर्स बाजारात पैशाची गुंतवणुक करून अधिकचा मोबदला मिळवून देतो. त्यासाठी भांडवल म्हणून जेलरोड (नाशिकरोड) येथील स्टेट बैंकेत ओळख असून तेथून पर्सनल लोन करून देतो, तेथून मिळालेले पैसे स्कीम मध्ये गुंतविल्यास मी दरमहा ६ टक्के व्याज देतो, 
असे आमिष दाखवून रेल्वे सुरक्षा बलाच्या सहायक उपनिरीक्षकासह उर्वरीत २५ जणांना दोन कोटी ९१ लाखांना गंडवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ओमप्रकाश यादव या आरोपीविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

असलम सरदार शाह (५७, रा. आरपीएफ बॅरेक, सिन्नर फाटा, नाशिक रोड) हे रेल्वे सुरक्षा बल मध्ये सहायक उपनिरीक्षक असून त्यांचा सहकारी सहायक उपनिरीक्षक अंबिका यादव यांच्यामुळे आरोपीशी ओळख झाली. 

त्याने शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीचे महत्त्व पटवून सांगितले. शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करणेसाठी झिरोदा, एस.एम.सी ग्लोबल, एंजल ब्रोकींग या शेअर ट्रेड करणारे कंपनीचा एजंट असुन असुन त्याने त्याचे डिमॅट अकाउंटचे व्यवसायातून बरेच लोकांना चांगला मोबदला मिळवून दिला असल्याचे व आर्थिक गुंतवणुक केल्यास बँकेपेक्षा जास्त व्याज देणार असल्याचे आमिष दाखवले.

शाह यांनी गुंतवणुकीसाठी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने त्याची जेल रोड, नाशिक रोड येथील भारतीय स्टेट बैंकेत ओळख असून तेथुन पर्सनल लोन करून देतो, तेथून मिळालेले पैसे स्कीम मध्ये गुंतविल्यास तुम्हाला दरमहा ०६ टक्के व्याज देतो. त्यामध्ये तुमचे पर्सनल लोन चा हप्ता देखील निघुन जाईल तसेच भरपुर आर्थिक फायदा होईल असे भासवले. या योजनेत रेल्वे सुरक्षा बलाच्या अनेकांनी पैसे गुंतवल्याचे सांगून आरोपीने विश्वास संपादन केला. 

आरोपीने शाह यांना जेलरोडवरील स्टेट बँकेत नेऊन स्वतःच्या ओळखीचा फायदा करत फिर्यादीने नावाने १० लाखांचे कर्ज मंजूर केले. त्यासाठी शाह यांच्या कागदपत्राचा वापर करण्यात आला. कर्जाचे पैसे खात्यात येताच आरोपीने ते पैसे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्यानंतर शाह यांना कळाले की, आपल्याप्रमाणे ईतर सहकारी आणि इतरांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली असून फसवणुकीची एकूण रक्कम दोन कोटी, ९१ लाख असल्याने पोलिसांकडे धाव घेण्यात आली.

नाशिकरोड पोलिसांनी फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हित संबंधाचे संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group