प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रेयसीला धर्मान्तर करण्यास सांगून नंतर पर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रेयसीला धर्मान्तर करण्यास सांगून नंतर पर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले
img
दैनिक भ्रमर



नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- खोटे नाव सांगून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मारहाण करणार्‍या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तरुणी इंदिरानगर परिसरात राहते. तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी सोहेल आवेश अन्सारी (वय 25, रा. भारतनगर, मुंबई नाका, नाशिक) याने त्याचे नाव विशाल जाधव असे असल्याचे खोटे सांगून फसवणूक करून फिर्यादीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे खोटे आमिष दाखविले.

त्यानंतर सातपूर परिसरातील हॉटेलमध्ये घेऊन जात तरुणीशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तसेच पीडितेला बळजबरीने मुस्लिम धर्म स्वीकारायला लावून लग्न केले. लग्नानंतर आरोपीने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पीडितेला परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले; मात्र पीडितेने असे संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा राग आल्याने आरोपी सोहेल अन्सारी याने पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार मे ते सप्टेंबर 2025 या कालावधीत वडाळा गाव येथे घडला.

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोहेल अन्सारी याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group