नाशिक : 'याठिकाणी' एक दिवसाचे अर्भक आढळल्याने खळबळ
नाशिक : 'याठिकाणी' एक दिवसाचे अर्भक आढळल्याने खळबळ
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : गोदावरी नदीपात्रात पाण्याच्या कडेला एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

याबाबत पोलीस हवालदार संदीप गांगुर्डे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात कोणी तरी अज्ञात इसमाने एक दिवसाचे पुरुष जातीचे नवजात बालक हे त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने टाकून दिले होते. 

भीषण अपघात ! भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू

हे अर्भक अमरधामजवळील गोदावरी नदीपात्राच्या पाण्याच्या कडेला आढळून आले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group