नाशिक : पक्षप्रवेशावरुन गिरीश महाजांसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा
नाशिक : पक्षप्रवेशावरुन गिरीश महाजांसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा
img
वैष्णवी सांगळे
आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय फोडाफाडीला सुरुवात केली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून गुरुवारी भाजपकडून नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे दोन बडे मोहरे गळाला लावले. ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा आज पक्षप्रवेश झाला. मात्र, या पक्षप्रवेशाला भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि भाजपच्या निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला. 

दरम्यान नाशिकमध्ये भाजप कार्यालयाबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाला विरोध करत नव्याने प्रवेश घेणाऱ्यांना रोखून धरल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जवळपास एक तास माजी महापौर विनायक पांडे, मनसे नेते यतीन वाघ, काँग्रेस नेते शाहू खैरे आणि माजी आमदार नितीन भोसले हे भाजप कार्यालयाबाहेर प्रतीक्षेत होते. मात्र, स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावर आक्षेप घेतल्याने परिस्थिती चिघळली.

नवे आणि जुने कार्यकर्ते आमने-सामने येऊ नयेत यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आला होता. देवयानी फरांदे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये शहरातील रेडीसन ब्ल्यु या हॉटेलमध्ये बैठक पार पडली. यानंतर महाजन यांच्या उपस्थित या सगळ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.


Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group