चांदवड तालुक्यातील जवान किशोर ठोके यांना वीर मरण
चांदवड तालुक्यातील जवान किशोर ठोके यांना वीर मरण
img
वैष्णवी सांगळे
नाशिक :- चांदवड तालुक्यातील कोलटेक-पाटे येथील भूमिपुत्र किशोर अंबादास ठोके (३०) या जवानाचे हृदयविकाराने निधन झाले. ते जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे ५६ मध्ये सेवा बजावत होते. जम्मू काश्मीर 56RR  येथे कर्तव्यावर असताना शहीद जवान किशोर अंबादास ठोके यांना वीर मरण आले. त्यांचे पार्थिव आज दुपारी 4 वाजता ओझर विमानतळ नाशिक येथे पोहचेल. 

आज त्यांचे पार्थिव मिलिटरी हॉस्पिटल देवळाली येथे ठेवण्यात येईल. उद्या (दि.14) त्यांचे पार्थिव एम एच देवळाली येथून त्यांच्या मूळ गावी पाटे तालुका चांदवड येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे.

किशोर ठोके यांचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या पत्नी दिघवद (तालुका चांदवड) येथील असून सध्या बाळंतपणासाठी माहेरी आहेत. १७ डिसेंबर रोजी प्रसूतीची संभाव्यता डॉक्टरांनी दिली आहे. या कारणामुळेच शहीद किशोर काही दिवसांत सुट्टीवर मूळ गावी येणार होते. परंतु, त्याआधीच नियतीने घाव घातल्याने ठोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group