नाशिक : स्थायी समिती सदस्यपदी ‘या’ नगरसेवकांची नियुक्ती
नाशिक : स्थायी समिती सदस्यपदी ‘या’ नगरसेवकांची नियुक्ती
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची निवड आज करण्यात आली. स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी आज सकाळी महानगरपालिकेत महासभा आयोजित करण्यात आली होती.

 यामध्ये भाजपकडून माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, डॉ. दिपाली कुलकर्णी, अदिती पांडे, सरीता सोनवणे, मच्छिंद्र सानप, जयश्री गायकवाड, इंदूमती खेताडे यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून किरण गामणे, राहुल दिवे, रंजना बोराडे व मयुरी पवार, राष्ट्रवादीकडून मुकेश शहाणे, ठाकरे गटाकडून भारती ताजनपुरे व योगेश गाडेकर यांची वर्णी लागली आहे. सभापतिपदी मच्छिंद्र सानप यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

नवनिर्वाचित स्थायी समिती सदस्यांचा महापौर, उपमहापौरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group