नाशिक : भाजपच्या विजयी उमेदवाराला मारहाण , ठार मारण्याची दिली धमकी
नाशिक : भाजपच्या विजयी उमेदवाराला मारहाण , ठार मारण्याची दिली धमकी
img
वैष्णवी सांगळे
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- जेलरोड येथील प्रभाग क्रमांक 18 मधून दुसर्‍यांदा विजयी झालेले भाजपचे उमेदवार प्रा. शरद मोरे यांना त्यांच्या निवासस्थानी पिस्तुलधारी दोन गुंडांनी मारहाण केली. शरद मोरे हे अर्धांगवायूने आजारी असताना हा भ्याड हल्ला झाला. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

मोरे यांनी सांगितले, की या गुंडांनी अभिनंदन करण्याच्या बहाण्याने मला मारहाण केली. त्यांच्या कंबरेला पिस्तुल होते. मला ठार मारण्याची धमकी देत पलायन केले. शिंदे गटाचे नेते पवन पवार यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती शरद मोरे यांनी दिली.


मोरे यांनी दिलेली माहिती अशी, की माजी नगरसेवक पवन पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांना प्रभाग 18 मधून शिवसेनेच्या शिंदे गटाने उमेदवारी दिली होती. भाजपकडून प्रा. मोरे हे उमेदवार होते. आजारी असतानाही प्रचार करून चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मोरे यांनी आशा पवार यांचा पराभव केला.

विजयानंतर सायंकाळी प्रा. मोरे हे त्यांच्या मोरे मळ्यातील निवासस्थानी नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असताना पवन पवार यांचे दोन कार्यकर्ते शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने आले. त्यांनी मोरे यांच्याशी हस्तांदोलन केले. एकाने थेट श्रीमुखात भडकावली.अचानक झालेल्या हल्ल्याने मोरे कुटुंबीय दहशतीखाली आले.अर्धांगवायूचा झटका आल्याने मोरे काही दिवस रुग्णालयात होते. नुकतेच ते घरी आले होते.

संघाचे पदाधिकारी आचार्य तुषार भोसले यांनी मोरे यांची भेट घेऊन विचारपूस केली. या गुंडांनी घरातील एका महिलेचा हात पिरगळला, जीवे मारण्याची धमकी दिली, असे मोरे यांनी सांगितले. आपण या गुंडांना ओळखत असून, पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राहुल ढिकले यांना ही घटना कळविली असून कायद्याच्या बालेकिल्ल्यात असा हल्ला करणार्‍या या गुंडांवर कारवाईची मागणी मोरे यांनी
केली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group