नाशिकमध्ये
नाशिकमध्ये "या" भागांत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) नाशिक महानगर पालिका हद्दीतील सातपूर तसेच नाशिक पश्चिम विभागातील काही भागात पाण्याची गळती थांबवण्यासाठी व पाईपलाईन दुरुस्तीकरिता २३ तारखेचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, तर २४ तारखेला होणारा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

सातपूर विभागातील विभागातील प्र.क्र.९ कार्बन नाका, कार्बन कंपनी कंपाऊंड वॉल लगत व श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळा, शिवाजी नगर अश्या एकूण २ ठिकाणी १२०० मी. मी. व्यासाच्या पाईप लाईनवर गळती सुरु आहे.

या पाईप लाईन दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घेणे आवश्यक असल्याने सातपुर व नाशिक पश्चिम विभागातील खालील नमूद प्रभागात दुरुस्तीच्या कामाकरिता शुक्रवार दि.२३ रोजी सकाळी ९ वाजेपासुनचा पाणी पुरवठा बंद करावा लागेल.

तसेच दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यानंतर शनिवार दि.२४ रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. याची नागरिकानी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

सातपुर विभागातील प्रभाग क्र. ८ बळवंत नगर जलकुंभ परिसर, सोमेश्वर कॉलनी, सुवर्णकार नगर, रामेश्वर नगर, बेंडकुळे नगर, पाटील पार्क परिसर, नवशा गणपती परीसर, पाटील पार्क, आनंदवली, सावरकर नगर, पाईपलाईन रोड, काळे नगर,  सदगुरु नगर, खांदवे नगर, गणेश कॉलनी, सुयोग कॉलनी, कामगार नगर, गुलमोहर विहार, विवेकानंद नगर, निर्मल कॉलनी, काळे नगर, शंकर नगर, चित्रांगण सोसायटी परिसर, मते नर्सरी रोड परिसर
प्रभाग क्र.१० अशोक नगर, जाधव संकुल, समृद्धी नगर, वास्तु नगर, विवेकानंद नगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माऊली, संभाजी नगर, राधाकृष्ण नगर व इतर परिसर, तसेच प्रभाग क्र. ११ प्रबुद्ध नगर व इतर परिसर या भागात पाणी येणार नाही.

नाशिक पश्चिम विभागात प्रभाग क्र. ७ भागश :  
नहुष जलकुंभ परिसर, नरसिंह नगर, पुर्णवाद नगर, अरिहंत हॉस्पीटील परीसर, दाते नगर, अयोध्या कॉलनी, तेजोप्रभा  आनंद नगर, डि. के. नगर, शांती निकेतन सोसायटी परिसर, आयचित नगर परिसर, चैतन्य नगर परिसर, सहदेव नगर परिसर, पंपींग स्टेशन परिसर, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिक नगर व इतर परिसर सावरकर नगर, दाते नगर, राम नगर, उदय कॉलनी, नेर्लीकर हॉस्पीटल परिसर, जहान सर्कल परिसर.

प्रभाग क्र. १२ भागश: - रामराज्य जलकुंभ परिसर, यशवंत कॉलनी, कल्पना नगर, डिसुझा कॉलनी, कॉलज रोड व इतर परिसर डिसुझा कॉलनी, शिवगीरी सोसायटी, कॉलेज रोड परिसर, एस.टी. कॉलनी परिसर, शहीद चौक परीसर या परिसरात २३ तारखेला पण सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तर २४ तारखेला सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group