नाशिक : पहिल्या स्थायी समितीच्या विशेष सभेत ३०११.८५ कोटी खर्चाचा अर्थसंकल्प सादर
नाशिक : पहिल्या स्थायी समितीच्या विशेष सभेत ३०११.८५ कोटी खर्चाचा अर्थसंकल्प सादर
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिक महानगर पालिका स्थायी समितीची पहिली विशेष सभेत २०२६-२७ या अर्थिक वर्षांकरिता ३०११.८५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांना सादर केला. स्थायी समितीमध्ये सर्व सदस्य नवीन असल्याने अभ्यासासाठी काही वेळे आवश्यक असून अभ्यासासाठी अवधी हवा म्हणून पुढील बैठकीत म्हणजेच ५ तारखेला यावर चर्चा केली जावी अशी मागणी सदस्यांनी केली.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी या अंदाजपत्रकात विशेष तरतूद करताना नगरसेवकांना प्रभाग विकासकामांसाठी देखील तरतूद करण्याचे नियोजन या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून आयुक्तांनी केले आहे. आता २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात देखील सिंहस्थासाठी मोठी तरतूद प्रशासनाला करावी लागणार आहे. अंदाजपत्रकातील बराचसा निधी सिंहस्थ कामांवर खर्ची पडणार आहे. त्या  दृष्टीने आज झालेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत  अर्थसंकल्प सादर केला आहे.

या संपूर्ण जमा व खर्चाचा अर्थसंकल्प त्याचबरोबर कोण कोणत्या कामांवर किती खर्च याची सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थायी समितीच्या पहिला विशेष सभेसाठी माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, डॉ. दीपाली कुलकर्णी, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मयुरी पवार, किरण गामने-दराडे, रंजना बोराडे भारती ताजनपुरे, योगेश गाडेकर, सीमा ठाकरे मुकेश शहाणे हे सदस्य उपस्थित होते. 

नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची पहिली सभा ११ वाजून ३३ मिनिटांनी वंदे मातरम व महाराष्ट्र गीतानंतर सुरू झाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group