नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जीएसटीचे बिल भरण्यासाठी दिलेली रक्कम जमा न करता 30 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक करणार्या महिलेसह तिच्या सहकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गॅब्रिएल इंडिया कंपनीने किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने कोणाचीही फसवणूक केली नसून, उलट कंपनीची फसवणूक त्यांच्या व्हेंडरकडून करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अलोक लक्ष्मीनारायण त्रिपाठी (रा. गौतमबुद्धनगर, उत्तर प्रदेश) हे अंबड एमआयडीसीमध्ये गॅब्रिएल इं. लि. या कंपनीत काम करतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी ज्योती जगत भाटिया (रा. फरीदाबाद, हरियाना) व त्यांचे इतर सहकारी यांनी संगनमत करून ऑटोमोटिव्ह पार्ट गॅब्रिएल कंपनीला पुरविले होते.
एकूण 30 लाख 82 हजार 77 रुपयांची 427 टॅक्स बिले जीएसटी बिल हे गॅब्रिएल कंपनीकडून विनायक डाय कास्ट प्रोप्रायटर ज्योती जगत भाटिया यांना अंबड एमआयडीसी, नाशिक व त्यांच्या इतर सहकार्यांना ठरलेल्या कराराप्रमाणे देऊन तो योग्य त्या जीएसटी प्राधिकरणाकडे भरावयास दिले होते; परंतु ही रक्कम त्यांनी न भरता गॅब्रिएल कंपनीची फसवणूक व विश्वासघात करून 30 लाख 82 हजार 77 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार दि. 1 ऑगस्ट 2018 ते 31 मे 2019 या कालावधीत अंबड एमआयडीसीत घडला.