संजय राऊत यांचा नाशिकमध्ये भाजपावर हल्लाबोल
संजय राऊत यांचा नाशिकमध्ये भाजपावर हल्लाबोल
img
सुधीर कुलकर्णी



नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- देशातील निवडणुकीच्या माध्यमातून वर्चस्व मिळवित भाजपा हे गुलामगिरीचे वर्चस्व गादच गाजवत आहेत. पश्चिम बंगाल आता गुजरात करून ठेवतील, असे सांगत शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. 

संजय राऊत नाशिक येथे आले असता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हुकूमशहा झाले असून या त्यांच्या पक्षातील सर्व मंत्री हे शंड आहेत. पहलगामा येथील घटनेनंतर पाकिस्तानचा पूर्ण बदला घेतलेला नसतानाही केवळ ट्रम्प यांच्या दमदाटीमुळे पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर मागे घेतले असा आरोप राऊत त्यांनी केला.
व्यवस्थाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून भूमिपुत्रांवर अन्याय केला जात आहे.

ऊस महिलांना देखील कपडे फाढून मारहाण केली जात आहे. यासंदर्भात मारहाण झालेल्या महिला व पुरुष आज संजय राऊत यांच्या भेटीला आले होते. पोलीस व अधिकाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीच्या जखमा दाखवत असताना राऊत म्हणाले की, व्यवस्था साठी धर्म ध्वजा उभारणीसाठी आलेल्या या मंत्र्यांना या गोष्टी कळत नाही का? हीच का त्यांची धर्मध्वजा.

धर्म ध्वजेचे नाटक काय करतात असा सवाल करीत राऊत म्हणाले की, शहराच्या विकास कामात खासदार लोकप्रतिनिधी कोणालाही विश्वासात घेतले जात नाही. मंत्र्यांनी केवळ वसुलीसाठी अधिकारी नेमले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. 

हाच प्रश्न आपण हातात घेतला असून जमीन अधिग्रहण वादातून झालेली मारहाण करणारे अधिकारी हे परप्रांतीय आहे. केवळ एका मंत्र्याच्या सांगण्यावरून त्यांना येथे वसुलीसाठी नेमण्यात आले आहे. याची चौकशी व्हावी अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. भाजपा हा शंढ लोकांचा पक्ष असून गुलामगिरीत काम करणारे आहेत. 

यावेळी शिवसेना उबाठा गटाचे नेते रवींद्र मिर्लेकर, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी, मनपा गटनेता केशव पोरजे, रवी वर्मा, निलेश साळुंके आदी उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group