भोंदू खरातचे 'काळे' साम्राज्य: जेलमध्ये असतानाही कोट्यवधींच्या जमिनींचे व्यवहार फत्ते!
भोंदू खरातचे 'काळे' साम्राज्य: जेलमध्ये असतानाही कोट्यवधींच्या जमिनींचे व्यवहार फत्ते!
img
नितीशा कुलकर्णी





भोंदू खरातचे दिवसेंदिवस नव नविन कारणामे उघड होत आहेत. त्याचे काळे धंधे आता जगासमोर येत आहे.  भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली गजाआड असलेला स्वयंघोषित महाराज अशोक खरात याच्या काळ्या धंद्यांचे नवे धागेदोरे आता उरण परिसरातून समोर येत आहेत.


खरात कोठडीत असताना देखील त्याच्या पत्नीच्या नावावर कोट्यवधींच्या जमिनीची महसूल नोंद अवघ्या काही दिवसांत पूर्ण झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासकीय यंत्रणेने दाखवलेल्या या 'वेगवान' तत्परतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे भोंदू खरातने अटकेच्या दिवशीच जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण केला असल्याची माहिती समोर आली आहे.


काय आहे नेमक प्रकरण समजून घ्या

अशोक खरातने उरणमधील चाणजे येथे अस्मिता म्हात्रे आणि कैलास शहा यांच्याकडून ५८ लाख ५० हजार रुपयांना जमिनीची खरेदी केली. हा व्यवहार १२ मार्च रोजी खरातची पत्नी कल्पना खरात हिच्या नावाने झाला. धक्कादायक बाब म्हणजे, १७ मार्च रोजी ज्या दिवशी खरातला गुन्ह्यात अटक झाली, त्याच दिवशी तलाठी सजा चाणजे यांनी या व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध केली. खरात पोलीस कोठडीत असतानाही महसूल यंत्रणेची चाके थांबली नाहीत. १३ एप्रिल रोजी अवघ्या महिनाभरात फेरफार क्रमांक ८३५१ मंजूर करून या जमिनीची महसूल नोंद पूर्ण करण्यात आली.


खरातला मिळणार तिप्पट जास्त मोबदला

राज्य सरकार आणि सिडकोद्वारे उरण परिसरात 'तिसरा मुंबई' प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पांतर्गत ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जातील, त्यांना २२.५% विकसित भूखंडाचा लाभ मिळणार आहे. हीच बाब ओळखून खरातने चाणजे आणि द्रोणागिरी नोडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ज्या जमिनीचा व्यवहार कागदोपत्री ५८ लाखांत दाखवला आहे, तिची बाजारपेठ किंमत आज ३ ते ४ कोटींच्या घरात आहे. जर या जमिनीचे भूसंपादन झाले, तर खरातला तिप्पट जास्त मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खरातला सध्या पाचव्या गुन्ह्यात ८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता सहाव्या गुन्ह्यात त्याला पुन्हा शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. एकीकडे खरात जेलमध्ये आहे आणि दुसरीकडे त्याच्या मालमत्तेची कामे वेगाने मार्गी लागत असल्याने, यात महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचे संगनमत आहे का? असा संशय आता बळावला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group