भोंदू बाबा अशोक खरातसह सहा जणांना कोर्टात हजेरीचे आदेश !
भोंदू बाबा अशोक खरातसह सहा जणांना कोर्टात हजेरीचे आदेश !
img
Nandini khandare More

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण झाली होती . दरम्यान आता या प्रकरणातील आणखी एक अपडेट समोर येत आहे. अशोककुमार एकनाथ खरात याच्यासह सर्व सहा संशयितांना मंगळवारी (दि. २२) न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या तब्बल तीन हजार पानांच्या दोषारोपपत्रावर (चार्जशीट) आज दोषनिश्चितीबाबत महत्त्वाची कार्यवाही होण्याची शक्यता निर्माण झाली असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​ईडीने (ED) या प्रकरणात ४२ कोटी ८८ लाख रुपयांचा अपहार आणि मनी ट्रेल सिद्ध करणारे तीन हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मात्र, सर्व संशयितांची न्यायालयात अधिकृत हजेरी पूर्ण न होणे आणि कायदेशीर प्रक्रियेतील काही तांत्रिक त्रुटींमुळे हे प्रकरण संशयितांची उपस्थिती या प्राथमिक टप्प्यावरच रेंगाळले होते. न्यायालयाला अद्याप अधिकृतपणे दोषारोप पटलावर घेता आले नव्हते. आज मंगळवारी सर्व संशयित प्रत्यक्ष हजर राहिल्यास, त्यांना चार्जशीटच्या प्रती मिळाल्याची शहानिशा करून न्यायालय जामिनाची प्रक्रिया किंवा थेट दोषनिश्चितीच्या पुढील टप्प्यासाठी तारीख निश्चित करू शकते.

​न्यायालयात ईडीच्या वतीने विशेष सरकारी वकील अरविंद आघव आणि ऋषभ शुक्ला बाजू मांडत आहेत. तर संशयित  खरातातर्फे ॲड. निरंजन मुंदडगी, मिलिंद बनकरतर्फे ॲड. उज्ज्वलकुमार चव्हाण व ॲड. भूषण यादव, तर संशयित आवारे आणि कांडेकर यांच्यामार्फत ॲड. राहुल कासलीवाल, ॲड. मिहीर कासलीवाल व ॲड. महेश पवार यांनी वकिलीपत्र दाखल केले आहे.

३१ सप्टेंबरला जामिनावर सुनावणी

संशयित कॅप्टन खरातवर नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात २५ मार्च रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ६ एप्रिल रोजी ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए २००२) स्वतंत्र गुन्हा नोंदवला. खरातविरुद्ध नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहाता येथे एकूण १७ गंभीर गुन्हे नोंद आहेत. यापैकी एका गुन्ह्यात त्याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर येत्या ३१ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.

​’या’ सहा संशयितांचा समावेश

१​अशोककुमार एकनाथ खरात (मुख्य संशयित)
२​कल्पना अशोक खरात (खरातची पत्नी)
​३अरविंद पांडुरंग बावके
४​नामकरण यशवंत आवारे
५​अविनाश वामन कांडेकर
६​मिलिंद दादासाहेब बनकर
इतर बातम्या
Join Whatsapp Group