डोळ्यांचे त्रास थांबत नाहीत? डोळ्यांत पाणी येणे, जळजळ जाणवते? मग 'अशी' घ्या योग्य काळजी
डोळ्यांचे त्रास थांबत नाहीत? डोळ्यांत पाणी येणे, जळजळ जाणवते? मग 'अशी' घ्या योग्य काळजी
img
नितीशा कुलकर्णी

उन्हाळा सुरू होताच डोळ्यांच्या अनेक समस्या जाणवू लागतात. उन्हळ्यात उष्णता वाढल्याने धूळ आणि सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांच्या तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषतः डोळ्यांतून पाणी येणे, कोरडेपणा, जळजळ, डोळे कोरडे पडणे आणि अॅलर्जी यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. लहान मुलांमध्येही या तक्रारी वाढल्याचे निरीक्षण नेत्ररोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

डोळ्यांतून सतत पाणी येणे, जळजळ होणे किंवा खाज सुटणे ही लक्षणे ऍलर्जी, कोरडेपणा (Dry Eyes), किंवा संसर्गामुळे (Infection) असू शकतात. या त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही खालीलप्रमाणे काळजी घेऊ शकता.

स्वच्छ पाण्याने धुवा:

डोळे जळजळत असल्यास किंवा काही गेल्यासारखे वाटत असल्यास, डोळे स्वच्छ आणि थंड पाण्याने धुवावेत.

थंड कॉम्प्रेस (Cold Compress)

डोळ्यांवर गार पाण्याने भिजवलेला कापड किंवा कॉटन पॅड १५-२० मिनिटे ठेवा. यामुळे सूज, खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.

स्क्रीन टाइम कमी करा

सतत संगणक, मोबाईल किंवा टीव्ही पाहिल्याने डोळे कोरडे पडतात. दर २० मिनिटांनी २० फूट दूर असलेल्या वस्तूवर २० सेकंद पाहा (20-20-20 नियम).

काकडी किंवा गुलाब पाणी:

डोळ्यांना थंडावा देण्यासाठी काकडीचे काप किंवा गुलाब पाण्यात भिजवलेला कापूस डोळ्यांवर ठेवा.

कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला?

जर घरगुती उपायांनी २-३ दिवसांत फरक पडला नाही, डोळ्यांतून जास्त स्त्राव येत असेल, दृष्टी अंधूक झाली असेल किंवा तीव्र वेदना होत असतील, तर त्वरित नेत्ररोग तज्ज्ञांना (Eye Doctor) दाखवावे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group