मैदानावरचा खेळ जीवावर बेतला! बारामतीत २६ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; भर उन्हात खेळताय तर सावधान!
मैदानावरचा खेळ जीवावर बेतला! बारामतीत २६ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; भर उन्हात खेळताय तर सावधान!
img
नितीशा कुलकर्णी









खेळाडूंनो, भर उन्हात क्रिकेट खेळताय? सावधान, हे तुमच्या जीवावर बेतू शकतं! बारामतीत एका तरुणाचा मैदानातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून दुपारी १२ ते ४ दरम्यान घराबाहेर पडताना कोणती काळजी घ्यावी? वाचा, तज्ज्ञ डॉक्टरांचा विशेष रिपोर्ट.

सध्या राज्यात उन्हाचा तडाखा तीव्र झाला आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून उष्णतेचा आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसत आहे. क्रिकेट खेळताना बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे 26 वर्षीय खेळाडूचा महेश राजेंद्र लोणकर याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. उन्हात खेळताना मृत्यूचं कारण काय? किंवा खरंच खेळणं जीवावर बेतू शकतं का?  तज्ञांकडू  जाणून घेऊ. खेळाडू असू देत किंवा सर्वसामान्य लोक त्यांनी दुपारी उन्हामध्ये बाहेर जाणे टाळावे. सध्या तापमान हे खूप जास्त वाढलेले आहे. उष्णतेचा पारा 43 ते 44 च्या पुढे गेलेला आहे. उष्माघाताचा धोका वाढला असून त्यामुळे अगदी मृत्यूच्या घटना देखील घडू शकतात. नागरिकांनी दुपारी 12 ते चारच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.

खेळाडूंनी या वेळेत अजिबात खेळू नये, असे डॉक्टर सांगतात. चक्कर येणे, छातीत जळजळ, डोळ्यांसमोर अंधारी येणे अशी उष्माघाताची लक्षणे असतात. काही वेळा दम देखील लागतो. खेळताना ही लक्षणे मुलांच्या लक्षात येत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, हे दुर्लक्ष जीवावर बेतू शकते. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावेत, असे डॉक्टर सांगतात.

 खेळताना चक्कर आल्यास...
एखाद्या खेळाडूला उन्हात खेळताना चक्कर आल्यास लगेच सावलीच्या ठिकाणी घेऊन जावे. थंड हवेच्या ठिकाणी, एसी रूममध्ये न्यावे. जवळ बर्फ असल्यास मानेवरती, हाताच्या खाली ठेवावे. थंड पाणी प्यायला द्यावे. त्यानंतर लगेच डॉक्टरांकडे घेऊन जावे. डॉ. चावरे सांगतात की, “शक्यतो भर उन्हात म्हणजे दुपारी 12 ते 4 दरम्यान क्रिकेट आणि इतर खेळ खेळणं टाळावं.” उन्हात खेळताना कपडे सुती घालावेत. तसेच ते थोडेसे हलके असावेत. त्यामुळे आपला घाम कपडे शोषून घेतात. पाणी जास्तीत जास्त प्यावे. या काळात डाएट व्यवस्थित घ्यावे. विशेषत: द्रव पदार्थांचा आहारात जास्त समावेश असावा. मोसंबी, टरबूज, खरबूज आदी फळांच्या ज्यूसचा समावेश करावा, असेही डॉक्टर सांगतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group