काय सांगता अमृतासारखं मानल जाणार कलिंगड हे फळ चुकिच्या वेळेस खाल्यास तुमच्या शरीरासाठी 'विष' ठरू शकतं? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कलिंगड खाण्याची योग्य वेळ कोणती आहे ते कधी आणि कसे खावे? जाणून घ्या.
उन्हाळ्याचा तडाखा वाढला की, रस्त्यारस्त्यावर रंगाने लालचुटूक आणि चवीला गोड अशा कलिंगडांच्या राशी दिसू लागतात. घामामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर, थकवा घालवण्यासाठी गारवा देणारं कलिंगड खाण्यासारखं दुसरं सुख नाही. 92% पाणी असलेलं हे फळ फक्त तहानच भागवत नाही, तर त्यात असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स आपल्याला उन्हाळ्यातील आजारांपासून वाचवतात.
पचन क्रियेवर परिणाम:
रात्रीच्या वेळी आपली पचन संस्था मंदावलेली असते. कलिंगडामध्ये साखर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. रात्री कलिंगड खाल्ल्याने अन्नाचे पचन नीट होत नाही, ज्यामुळे 'अॅसिड रिफ्लक्स' (Acid Reflux) किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.
झोपेत अडथळा:
कलिंगड हे Natural Diuretic आहे. म्हणजेच ते खाल्ल्यावर लघवीचे प्रमाण वाढते. जर तुम्ही झोपण्यापूर्वी कलिंगड खाल्ले, तर तुम्हाला रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागेल, ज्यामुळे तुमची गाढ झोप मोड होईल आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवेल.
वजनात वाढ
कलिंगडामध्ये नैसर्गिक साखर असते. रात्रीच्या वेळी आपली शारीरिक हालचाल शून्य असते, त्यामुळे ही साखर ऊर्जेत रूपांतरित न होता चरबीच्या स्वरूपात साठू शकते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी रात्री कलिंगड खाणे टाळावे कलिंगड खाल्ल्यानंतर किमान १ तास दूध पिणे टाळा. दूध आणि कलिंगड हे 'विरुद्ध आहार' मानले जातात, ज्यामुळे त्वचेचे विकार किंवा पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात.
कलिंगड खाताना'या' चुका टाळा
कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. यात आधीच भरपूर पाणी असल्याने लगेच वरून पाणी पिल्याने पचनसंस्थेतील पाचक रसांवर परिणाम होऊन अपचन होऊ शकते. कलिंगड खाल्ल्यानंतर किमान १ तास दूध पिणे टाळा. दूध आणि कलिंगड हे 'विरुद्ध आहार' मानले जातात, ज्यामुळे त्वचेचे विकार किंवा पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात