मोठी बातमी : HMPV व्हायरसची मुंबईत एन्ट्री ; ६ महिन्यांच्या बाळाला लागण
मोठी बातमी : HMPV व्हायरसची मुंबईत एन्ट्री ; ६ महिन्यांच्या बाळाला लागण
img
Dipali Ghadwaje
चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या HMPV ने भारताच्या चिंता वाढवल्या आहेत. आतापर्यंत देशभरात 8 पेक्षा जास्त रुग्ण आढळले असून HMPV व्हायरसने देशात एन्ट्री केलीच होती. मात्र आता त्याने मुंबईत देखील एन्ट्री केल्याची माहिती समोर आली आहे.  

HMPV चा एक रूग्ण मुंबईत सापडला आहे. एका ६ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसची लागण झाल्याची माहिती आहे. दरम्यान या बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. 

दरम्यान एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , आता या पार्श्वभुमीवर सरकार अलर्ट मोडवर आलं असून जे. जे हॉस्पिटल्सच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलीये.

HMPV ची लक्षणं 

सर्दी , खोकला ,ताप ,घसा खवखवणे ,धाप लागणे ,जुलाब , अंगावर पुरळ हे आहेत. 

काय करू नये?

डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळलं पाहिजे , हस्तांदोलन करू नये , सार्वजनिक ठिकाणी अजिबात थुंकू नका ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये , डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नये. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group