नागरिकांनो सावधान!
नागरिकांनो सावधान! "या" ठिकाणी २ गर्भवती महिलांसह ६ जणांना झिका व्हायरसची लागण
img
Dipali Ghadwaje
पुणे : महाराष्ट्रातील पुण्यात झिका विषाणूचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. यामुळे शहरात रुग्णाची संख्या सहा वर पोहोचली आहे. या रुग्णांमध्ये २ गरोदर महिलांचा समावेश आहे. पुण्यातील झिका विषाणूची संख्या ६ वर पोहोचल्यानंतर नागरिकांची चिंता वाढली आहे.

याबाबत  मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्यातील एरंडवणे या भागात २८ वर्षीय महिलेला झिका विषाणूची लागण झाली आहे. या महिलेचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आली आहे. तसेच १२ आठवड्याआधी एका गरोदर महिलेला झिका विषाणूची लागण झाली होती. सध्या या दोन्ही गरोदर महिलांची प्रकृती स्थिर आहे. गरोदर महिलांना झिका विषाणूची लागण झाल्याने भ्रूणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 मुलीसहित डॉक्टरला झाली लागण 

पुण्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण एरंडवणे परिसरात आढळला. या रुग्णाला ४६ वर्षीय डॉक्टरला झिका विषाणूची लागण झाली होती. तसेच या डॉक्टरच्या १५ वर्षीय मुलीलाही झिका विषाणूची लागण झाली होती. तर मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरातही २ रुग्ण आढळले होते. एका ४७ वर्षीय महिलेला लागण झाली होती. तर २२ वर्षीय व्यक्तीला झिकाची लागण झाली होती.

काय आहे झिका विषाणू? 

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, झिका विषाणू हा एडीज नावाचा डास चावल्याने पसरतो. एडीस डास चावल्याने डेंगू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप या आजारांना सामोरे जावे लागते. हे तिन्ही आजारांमध्ये साम्य आहे. तिन्ही आजार पश्चिम, मध्य आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया या भागात झाली. झिका विषाणू गरोदर महिलांना झाल्यानंतर त्यांच्या गर्भातील बाळालाही होतो.

काय आहेत झिका विषाणूची लक्षणे?

झिका विषाणूची लक्षणे सामान्य आहेत. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला डोकेदुखीची लक्षणे जाणवतात. शरीराचे स्नायू जड होतात. स्नायू दुखतात. शरीरारवर लाल रंगाच्या पुरळ उठण्यास सुरुवात होते. हिरड्याही दुखू लागतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group