मोठी बातमी ! पार्थ पवारांच्या कंपनीला पहिला धक्का, पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पहिली अटक
मोठी बातमी ! पार्थ पवारांच्या कंपनीला पहिला धक्का, पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पहिली अटक
img
वैष्णवी सांगळे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी पुण्यातील एका जमीनीच्या व्यवहारामुळे अडचणीत सापडली आहे. आता या प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे.त्यामुळे पार्थ पवार यांची धाकधूक वाढणार आहे. पार्थ पवारांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकण्यात आली होती. याप्रकरणी आता तिला अटक करण्यात आली आहे. 

अटकेनंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंढवा येथील कोट्यवधीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय ? 
पार्थ पवार यांच्या अमेडियाला कंपनीला पुण्यातील मोक्याची 1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी रुपयांत मिळाली होती. या प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारुंवर या तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. शीतल तेजवानी यांनी 300 कोटींच्या जमिनींच्या व्यवहारापोटी पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीकडून एक छद्दामही न घेता थेट खरेदीखत केल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते.
Pune |
इतर बातम्या
Join Whatsapp Group