राजकारण घाणेरडं... अर्ज माघारी घेतल्यानंतर भाजप उमेदवार अन् कुटुंबीय ढसाढसा रडले
राजकारण घाणेरडं... अर्ज माघारी घेतल्यानंतर भाजप उमेदवार अन् कुटुंबीय ढसाढसा रडले
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील २९ महापलिका निवडणुकीला आता वेग आला आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र या उमेदवारीवरून प्रचंड टीका पक्षातील कार्यकर्त्यांनी केली भाजपवर केली होती. त्यामुळे अखेर पूजा मोरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

पूजा मोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले होते. ट्रोलिंगमुळे पूजा मोरेला पुणे मनपाची उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ट्रोलर्सने पूजा मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेले टीकेची व्हिडिओ व्हायरल केले होते. यामुळे त्यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला आणि आज त्यांनी अर्ज मागे घेतला. यावेळी पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव हे ढसाढसा रडले. 

महापालिका निवडणुकीत भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही खाते उघडलं , शिवसेनेचा 'याठिकाणी' विजयी जल्लोष

पूजा मोरे पत्रकार परिषदेत रडल्या, नेमकं काय म्हणाल्या?
पूजा मोरे म्हणाल्या,आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे. हे सर्व बोलत असताना मला मागील 10-12 वर्षांचा सगळा संघर्ष आठवतोय.मी बीड जिल्ह्यातील देवराई तालुक्यातील गोधाकाठच्या अत्यंत छोट्या गावात जन्मलेली मुलगी होते. माझ्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाहीत. पण मी ज्या शेतकऱ्यांसाठी काम करत होते, त्यामुळे मला वयाच्या 21 व्या वर्षी पंयायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलं गेलं. मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या. कारण मी शेतकऱ्याच्या पोटची होते म्हणून..त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली. शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि ऐन तारुण्यात माझ्यावर पाच गुन्हे दाखल झाले. खूप कमी वयात मला न्यायालयाची पायरी चढावी लागली. हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या आयुष्यात होत नाही. 

"राजकारण घाणेरडं आहे, असं म्हणतात.पण.."
"न्यायालयात वकीलाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशात पैसे नसायचे. पण अशा परिस्थितीत त्यांचा आवाज बुलंद केला. मी बिनलग्नाची मुलगी होते.राजकारण घाणेरडं आहे, असं म्हणतात.पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काळीज ठेवून मला राजकारणात घातलं.पण मी सुद्धा तशी वागले आणि संघर्ष करत राहिले.छत्रपती संभाजी राजेंच्या आशिर्वादाने मराठा क्रांती मोर्चात आम्ही काम करत असताना संभाजी राजेंनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं.लग्नानंतर एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही. मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या कामासाठी बाहेर पडले आणि लोकांसाठी काम करायला लागले",असंही पूजा मोरे यांनी म्हटलं.

धनंजय जाधव काय म्हणाले?
आमच्या दोघांचा विवाह झाला, आमच्या दोघांची पक्षीय भूमिका तुम्ही सर्वांनी पाहिली. माझा संघर्ष टू व्हीलरपासून इथंपर्यंत आहे. आम्ही प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आहे. सोशल मीडियाचा बळी माझी पत्नी ठरली आहे. माझ्या पत्नीचे शब्द नव्हते, ते तिच्या तोंडात घातले गेले. आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही हे स्टेटमेंट पूजा जाधव हिचं नव्हतं, असं धनंजय जाधव म्हणाले.

पहलगामच्या प्रकरणात तिनं चुकीचं केलं नाही हे ती सांगेल. कार्यकर्त्यानं ठरवलं तर काय करु शकतो हे 2026 च्या निवडणुकीतून पुणे शहरातून दाखवून दिलं आहे.  प्रभाग क्रमांक 1 मध्ये तयारी केली, तिथल्या माता भगिनी, भाऊ आलेले आहेत. कोणत्याही पक्षाच्या सर्व्हेत आम्ही प्लस होतो. तिथं काय समीकरणं झाली, निष्ठावताला संधी दिली, त्याचा आम्ही स्वीकार केला. प्रभाग क्रमांक 1 च्या नागरिकांची माफी मागतो. सुहास चव्हाण, आदिती बाबर यांची माफी मागतो, असं धनंजय जाधव यांनी म्हटलं.


इतर बातम्या
Join Whatsapp Group