अजित दादांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली, १० दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश
अजित दादांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली, १० दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश
img
वैष्णवी सांगळे
महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारी भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढली आहे. तर इतर पक्षांना मोठा धक्का बसला आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेच्या अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुण्यामध्ये सोमवारी दुपारपासून रात्रीपर्यंत १० जणांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा पक्षप्रवेश झाला. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सोमवारी एका दिवसात सर्व पक्षातील माजी नगरसेवकांसह अनेक स्थानिक नेत्यांनी प्रवेश केला. आजही अनेक जण प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप, मनसे, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून १० जणांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद चांगलीच वाढली आहे. 

या मुख्य १० नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश -

आनंद मांजळकर - शिवसेना

धनंजय जाधव - भाजप

 जयराज लांडगे - मनसे

मधुकर मुसळे - भाजप

दत्ता बहिरट - काँग्रेस

शंकर पवार - भाजप

 मुकारी अलगुडे - भाजप

नीता मांजळकर - शिवसेना ठाकरे गट

स्वप्निल दुधाने - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

प्रकाश ढोरे - मनसे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवत आहेत. ४० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील. तर अजित पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर १२५ जागांवरती निवडणूक लढवतील. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group