ZP election result 2026 : मोहिते पाटील अन जानकरांना धक्का, भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
ZP election result 2026 : मोहिते पाटील अन जानकरांना धक्का, भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
img
वैष्णवी सांगळे
सोलापूर जिल्हा परिषदेतील निकालाचे अपडेट हाती येत असून माळशिरस तालुक्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपने धक्का दिलाय. तसेच, आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांचाही पराभव झाला आहे. दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला. 

सोलापुरातील माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. विद्यमान खासदार आणि आमदार यांनी एकत्र येत भाजपला आव्हान दिलं होतं. माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांची लढत शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांच्यासोबत होती. माळशिरस तालुक्यातील या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर, माजी आमदार राम सातपुते यांनी येथे भाजपचे कमळ खुलवले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group