दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाबाबत काय झालं हे सांगण्यासाठी रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार होते. मात्र त्यांनी ट्विट करून ही पत्रकार परिषद रद्द झाल्याचं सांगितलं असं असलं तरी आज त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी तो विदर्भातील नेता कोण याबाबत स्पष्टीकरण दिलं. रोहित पवार यांनी मी कोणावरही आरोप करत नाहीये किंवा कोणचं नाव घेत नाहीये. मात्र तुमचीच लोकं नाव घेत आहेत. प्रमोद हिंदूराव यांनी ते विदर्भातील नेते कोण हे सांगितलं आहे असं वक्तव्य केलं.
रोहित पवार यांनी विमान कंपनीला तर धारेवर धरलेच आहे. त्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. अजित पवार यांचा १०० टक्के घातपातच झाला असल्याचा त्यांनी म्हटले. आता रोहित पवार यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतलेय. प्रफुल्ल पटेल यांच्यामुळेच अजित पवार यांना २७ तारखेला मंत्रालयातून निघण्यास उशीर झाला, अन्यथा दादा रस्ते मार्गाने पुण्याला जाणार होते, असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार नक्की काय म्हणाले ?
जर 27 जानेवारी 2026 रोजी अजितदादा पुण्याला कारने गेले असते तर पुण्याला पोहचले आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला गेले असते. तर मग ही दुर्दैवी घटना घडली नसती. 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यावर मी अगोदर बोललो आहे. बैठकीला उशीर झाला. त्यानंतर कुणाचा फोन आला हे लोकांना आता कळालं आहे. फाईलवर मुद्दामहून तिथल्या तिथं स्वाक्षरी झाली पाहिजे अशी एका नेत्याने इच्छा व्यक्त केली. दादांनी ती स्वाक्षरी केली आणि संध्याकाळी 7.13 वाजता, विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचं विमानाने जाण्याचा प्लॅन झाला असता तर 26 तारखेला संध्याकाळी अथवा 27 तारखेलाच दुपारी विमानाचं बुकिंग झालं असतं. जी काही क्रमवारी ती मी बोलून दाखवली. मी कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. माझं प्रामाणिक मत आहे की या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी. 27 तारेखापासून ते 28 तारखेपर्यंत चौकशी व्हायला पाहिजे. तर जे प्रमुख पायलट होते. ते कुणाला भेटले. महिनाभर आणि दोन महिन्याभर कुणाच्या संपर्कात होते, कुणाला भेटले होते याची सु्द्धा चौकशी व्हायला हवी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
प्रमोदराव हिंदूराव यांनी जी माहिती दिली, याचा अर्थ मी कुठंही खोटं बोललो नाही हे समोर येत आहे. जसं की 27 तारखेला सुनील तटकरे यांनी स्वतः सांगितले की तिथं स्वतः आलो, उशीरापर्यंत थांबलो. दुसर्या बाजूला प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला असे हिंदूराव सांगत आहेत. आणि मग उशीरा झाला. याचा अर्थ दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे. एका पॉलिटिकल कन्स्लटन्शीबाबत तिथं चर्चा झाली. योगायोग असा आहे की या पॉलिटिकल कन्स्टलन्शीने विमान सुद्धा विकत घेतलं आहे. आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटींचा कॉन्ट्रक्ट कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका होती. कदाचित त्यामुळे वाद विवाद झाला. सुनील तटकरे हे त्यावेळी तिथं होते. त्यामुळे दादांना उशीर झाला. उशीर झाला म्हणून दादा गाडीने जाण्याऐवजी विमानाने गेले असे रोहित पवार म्हणाले.
नरेश अरोरा यांना केवळ सर्व्हे पुरते ठेवा. मी काही कन्स्टलन्शीच्या माध्यमातून पक्ष चालवत नाही असे दादा म्हणाले होते, या चर्चेवर रोहित पवार यांनी भावना व्यक्त केल्या. याविषयीची जी माहिती समोर येत आहे ती खरी आहे. आम्ही जेव्हा बारामतीमध्ये दादांसोबत होतो. त्यावेळी सुद्धा नरेश अरोरा यांच्या कन्स्टलन्सीच्या लोकांना दादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये झापत होते. 27 तारखेला सुद्धा नरेश अरोरा याचा शेकडो कोटींचा कॉन्ट्रक्ट तसाच ठेवला पाहिजे, त्याला रक्कम द्यायला हवी अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची होती. 27 तारखेच्या बैठकीत तशीच भूमिका होती. पण अजितदादांची त्याविरोधात भूमिका होती असे रोहित पवार म्हणाले.