माझी हत्या करण्याचा प्रयत्न, राम सातपुतेंचा आरोप , थेट 'या' खासदाराचं नाव घेतलं
माझी हत्या करण्याचा प्रयत्न, राम सातपुतेंचा आरोप , थेट 'या' खासदाराचं नाव घेतलं
img
वैष्णवी सांगळे
सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये विजय मिळवला असल तरी, त्यांच्या घरातील सदस्यांना साताऱ्यात पराभव पत्कारावा लागला. माळशिरसच्या निकालावर भाष्य करताना माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता, अशी धक्कादायक माहिती मंत्री गोरे यांनी दिली.खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर गुंड म्हणत टीका केली होती, त्यावरून गोरे यांनी प्रत्त्युत्तर दिलं. दरम्यान जयकुमार गोरे यांनी केलल्या दाव्यानंतर आता राम सातपुते यांनी त्यांच्या हत्येच्या कटाबाबत भाष्य केलं आहे. 

माझ्या हत्येचा कट रचण्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड असतील, असा आरोप भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. माझ्या हत्येच्या कटासंदर्भात पोलिसांना अगोदरच माहिती मिळाली. त्यानुसार गेल्या 3 दिवसापासून पोलिस माळशिरस तालुक्यात तळ ठोकून आहेत. काही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा करण्याचा प्रकार होता. याबाबत आपल्या हत्येत कोण कोण असू शकते. या संदर्भात आपण मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना चिठ्ठी दिली असल्याचेही राम सातपुते यांनी सांगितले आहे. 

राम सातपुते यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जे काही सांगितलं, माझ्या हत्येचा कट रचण्यात आला आणि त्याचे त्यांना काही इनपूट मिळाले आहेत, मला हे सर्व कालच माहिती झालं, मुळात निवडणुकीच्या दरम्यानच नाही तर एंकदरीत इंटेलिजनचे गुप्त खात्याचे आणि आपल्या जिल्ह्याचे एसपी बाकी सगळ्यांना काही माहिती भेटली होती. त्यावरती चौकशी सुरू आहे. कुठल्यातरी बाहेरच्या टोळीला सांगून कॉन्ट्रॅक्ट किलिंग करायचा काहीतरी कट असल्याचं एकंदरीत पोलिस प्रशासन,इंटेलिजनने पुढे आलेले आहे, या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सगळ्या नेते मंडळीच्या कानावरती हा विषय दिलेला आहे. 

जयकुमार गोरे यांनी हा विषय सर्वत्र सांगितला आहे. हा विषय त्यांच्या कानावर आला,  तेव्हापासून सर्व प्रशासन, पोलिस प्रशासन माळशिरस तालुक्यात तळ ठोकून आहे, काही लोकांना उचललं आहे, काही लोकांच्या चौकशा सुरू आहेत, त्यांचे बँक डिटेल तपासले जात असल्याचंही राम सातपुते यांनी सांगितलं आहे.तर ते पुढे बोलताना म्हणाले की, जे काही तपास आहेत ते सुरू आहेत, प्रामु्ख्याने धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील हे काही लोकांना पुढे करून असे प्रकार करत असल्याचं आमच्या कानावर आलं आहे, मुळात संवैधानिक पध्दतीने आम्ही ही निवडणूक लढवली आहे, राम सातपुते कायदा माननारा माणूस आहे, संविधानाने चालणारा मी आहे, अशा पध्दतीने ठोकशाहीची भाषा करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टींना सिरीअसली घेतलं आहे. 

मला हा प्रकार दोन दिवसांनी माहिती झाला, जिल्ह्याचे एसपी आणि पालकमंत्री आय़जी यांच्या लेवलवरती हा विषय सुरू होता, मला काल हा विषय माहिती झाला, मुळात असे प्रकार करणं ही यांची संस्कृती आहे, त्यामुळे भविष्यामध्ये माझ्या जिवाला काही झालं तर याची चिठ्ठी मी काल पालकमंत्री गोरे यांच्याकडे दिली आहे, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरती सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत, अशा पध्दतीने दे राजकारण करत असतील तर ते दुर्दैवी आणि घातक आहे, असंही राम सातपुते यांनी म्हटलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group