सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व विजय मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर येथे प्रणिती शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. टीका करताना गोरे म्हणाले, दोन कदम पिछे नही हटे....50 कदम नीचे गिरे....वो भी टांग उपर असे वक्तव्य गोरेंनी केलेय. गोरेंच्या या वक्तव्यानंतर सोलापूरमधील लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रणिती शिंदें यांनी सोमवारी एक भावनिक पत्र काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी लिहिलं होतं.पत्राच्या शेवटी हिंदीतुन प्रणिती शिंदेंनी " झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं, पर सिर्फ अगली छलांग लगाने। यावर पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी दो कदम पिछे नही हटे, 50 कदम निचे गिरे है फिरभी टांग उपर अशा शेलक्या भाषेत जय कुमार गोरे यांनी प्रणिती शिंदें बाबत बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.