सोलापूर : आठवडाभरानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या जाहीर सभेत ‘मोदी की गॅरंटी’ या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या घोषणेचा दहा पेक्षा अधिक वेळा उल्लेख करीत मतदारांना आपल्याला पुन्हा निवडून देण्याची भावनिक साद घातली. एक प्रकारे मोदी यांनी निवडणूक प्रचाराचे रणशिंगच सोलापूरमध्ये फुंकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केलं. यावेळी असंघटित आणि विडी कामगारांसाठी 350 एकर परिसर, 834 इमारती , 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावनिक झाले.
आज 1 लाख पेक्षा जास्त परिवाराचा गृह प्रवेश होईल. माझा आनंद वाढणार की नाही? सर्वजण आपल्या घरात राम ज्योती प्रजवलीत करणार की नाही? आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होतोय. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकापर्ण झालं. मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं, असं म्हणत मोदींचा कंठ दाठला आणि मोदी भावनाविवश झाले. तसेच, आपल्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी, असं मोदी म्हणाले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "पंढरपूरच्या विठ्ठलालाला आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमन करत आहे. 22 जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. आपले भगवान राम आपल्या मंदिरात विराजमान होतील. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी 11 दिवस साधना करणार आहे. तुमच्या आशिर्वादानं मी तिकडे जाणार आहे. माझ्या अनुष्ठानची सुरुवात महाराष्ट्राच्या नाशिक येथील पंचवटी येथून झाली. आज 1 लाख पेक्षा जास्त परिवाराचा गृहप्रवेश होईल."
भर भाषणात मोदी भावूक, क्षणभर भाषण थांबवलं अन् आवंढा गिळला
"माझा आनंद वाढणार की नाही. सर्वजण आपल्या घरात राम ज्योती प्रजवलीत करणार की नाही, आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होतोय. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकापर्ण झालं.", असं मोदी म्हणाले. मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं, असं म्हणत मोदींना अश्रू अनावर झाले आणि ते भावूक झाले. मोदींनी क्षणभर भाषण थांबवलं आणि आवंढा गिळला.