आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारताविरोधातील कोणतेही दहशतवादी कृत्य अॅक्ट ऑफ वॉर मानले जाणार आहे.
आता दहशतवादाविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही. भविष्यात भारताविरोधात होणारी कोणतीही दहशतवादी कारवाई ही भारताविरुद्धचे युद्ध मानली जाईल आणि या प्रकारच्या कृतींना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल.
पाकिस्तानकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या ना-पाक कारवायांना भारत कशाप्रकारे तोंड देत आहेत याबद्दल माहिती देत आहे.
आज (दि.10) सकाळी साडेदहावाजतादेखील परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषध पार पडली होती. त्यानंतर आता पुन्हा संध्याकाळी सहा वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे.
PMO मध्ये उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरूच
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू असून, आज मोदींनी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस आणि तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते.