केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठवा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या ११ घोषणा केल्या. शेतकरी, मध्यमवर्ग, महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये टॅक्समध्ये सर्वांत मोठी घोषणा केली आहे.
बजेटमधून सर्वात मोठा दिलासा सर्वसामान्य नोकरदार वर्गाला मिळला आहे. सरकारने 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. 12 लाखांपर्यंत नोकरदारांना कोणताही टॅक्स लागणार नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन शब्दात बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे.
140 कोटी भारातीयांच्या अपेक्षांचे हे बजेट आहे. सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे हे बजेट आहे. बचत, आणि गुंतवणुक वाढवारे बजेट असून. देशाच्या विकालासा हातभार लावणारे बजेट आहे. बजेट हे सरकारची तिजोरी भरणारे असते. मात्र, हे बजेट याच्या उलट आहे.
सर्वसामान्यांचे खिसा नेहमी कसा भरलेला राहील यावर भर देणारे हे बजेट आहे. देशाचे नागरिक देशाच्या विकासात कशा प्रकारे सहभागी होतील यावर भर देणारे हे बजेट आहे.
देशातील नागरिकांना आत्मनिर्भर बनवणारे हे बजेट आहे. तरुणांसाठी आम्ही अनेक क्षेत्रे खुली करण्यात आली आहेत. हे विकसित भारताच्या मिशनला चालना देणार बजेट आहे. हे बजेट फोर्स मल्टीप्लायर आहे. जनतेची स्वप्ने पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प शक्ती वाढवणारा आहे.
या अर्थसंकल्पामुळे बचत, गुंतवणूक, उपभोग आणि वृद्धी वाढणार आहे. देशातील नागरिकांची बचत कशी वाढणार आहे आणि देशातील नागरिक विकासाचे भागीदार कसे होणार आहे या अर्थसंकल्पाने त्याचा खूप भक्कम पाया रचला आहे.
लोककेंद्रित अर्थसंकल्प आणल्याबद्दल मी निर्मला सीतारामन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो असे पीएम मोदी म्हणाले.