मोठी बातमी : विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी आज भाजपच्या
मोठी बातमी : विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी आज भाजपच्या "या" आमदाराची होणार नियुक्ती
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर  यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आज हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन शपथ घेणार आहे. विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल. 7, 8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

कालीदास कोळंबकर काय म्हणाले?

माझा पक्षाकडून आज मला हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेण्यास सांगितल आहे. त्यानुसार मी शपथ आज दुपारी घेणारआहे. पुढे विधानसभा अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्याबाबत पक्ष निर्णय घेईल. मात्र मी माझी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखवली आहे, असं काळीदास कोळंबकर म्हणाले.

तीन दिवसीय विधिमंडळाचं विशेष अधिवेशन

येत्या 7 डिसेंबरला तीन दिवसीय विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडून सर्व कर्मचाऱ्यांना तयारीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे.  आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्ष निवड होईल. 
 
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group