पार्थ पवार यांच्या क्लीनचीटवर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले,  फडणवीस हे…
पार्थ पवार यांच्या क्लीनचीटवर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले, फडणवीस हे…
img
वैष्णवी सांगळे
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवार यांना क्लिनचिट देण्यात आली असून खरगे समितीचा अहवाल लवकरच सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यांचे नाव आणि संमती नसल्याने त्यांना क्लिनचिट देण्यात आल्याची चर्चा आहे. पार्थ पवार यांना क्लीनचीट देण्याच्या विषयात संजय राऊत म्हणाले की, “हायकोर्टाने यावर काही ताशेर मारले होते ते सहज पुसले जाणार नाहीत. देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाहीत, महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही. पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीनचीट घेऊन बाहेर पडायला पाहिजे होतं. कारण ते राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत. पार्थ पवार यांचा या व्यवहाराराशी काही संबंध नाही, याला बेनामी काम करणं असं म्हणतात. कायदेशीर भाषेत बेनामी व्यवहार म्हणतात. सरकार त्यांचं, मुख्यमंत्री त्यांचा आहे. त्यांचा पक्ष फडणवीस चालवत आहेत. अशावेळी महाराष्ट्राची जनता काय करु शकते” असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणले, पद आणि प्रतिष्ठा दिली, तसेच ताकद दिली, तेच लोक आता शरद पवारांनी काय करावे आणि काय करू नये, याचे सल्ले देत आहेत. विशेषतः सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतायत, हे फार इंटरेस्टिंग आहे, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते म्हणाले की,  राष्ट्रवादीच्या अंतर्गत विलिनीकरणाच्या विषयाशी शिवसेनेचा काही संबंध नाही. आमचा विषय इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीशी आहे आणि शरद पवार या आघाडीचे सदस्य आहेत, तोपर्यंतच आमचा या विषयाशी संबंध असल्याचे ते म्हणाले. विलिनीकरणाच्या संदर्भात अनेक पतंग उडवले जात आहेत. एक गट म्हणतो चर्चा झाली, तर दुसरा गट म्हणतो चर्चा झाली नाही, त्यामुळे नक्की विश्वास कोणावर ठेवायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group