पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील महार वतन जमीन खरेदी व्यवहारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली असतली तरी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. आज पत्रकार परिषद घेत पार्थ पवार जमीन व्यवहाराचा करार कायद्याने रद्द करता येणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान या जमीन व्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हल्लाबोल केला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना जमीन घोटाळ्याची चौकशी नीट होऊ शकेल का? असा सवाल दमानियांनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील दमानियांनी केला आहे.
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, माझं चॅलेंज आहे, देवेंद्र फडणवीस तसं करणार नाहीत कारण आत्ताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत आता त्यांना ही सगळी मंडळी लागणार आहेत. पण हे केलं गेलं पाहिजे मी कायद्यानुसार ही मागणी केली आहे जर हे झालं नाही तर मी विकास खर्गेजींना जाऊन भेटणार आहे त्यांच्या अध्यक्षतेखालील या सगळ्याची चौकशी होणार आहे या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या समोर जाऊन मांडणार आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, त्याशिवाय व्यवस्थित चौकशी होणार नाही, पवारांच्या एकूण 69 कंपन्या आहेत, मी सगळ्याचा अभ्यास करणार आहे. मी मालिकाच करायचं ठरवलं आहे. अजित पवारांच्या आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या सगळ्या कंपन्या आहेत, त्याच्यात जमिनीचे किती किती व्यवहार झाले आहेत, हे सगळ मी हळूहळू काढणार आहे. असंही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.