संतोष देशमुख हत्या प्रकरण : अंजली दमानियांचा पुन्हा एकदा गौप्यस्पोट ; केली
संतोष देशमुख हत्या प्रकरण : अंजली दमानियांचा पुन्हा एकदा गौप्यस्पोट ; केली "ही" मागणी
img
Dipali Ghadwaje
बीड :  संतोष देशमुख हत्याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.  संतोष देशमुख हत्याप्रकरणात आणखी महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने त्या वाल्मिक कराड विषयी धक्कादायक खुलासे करत असतात.

दरम्यान आता अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या सिव्हिल सर्जनची अशोक थोरात  यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या संदर्भात एक्सवर पोस्ट केली.

हॉटेल पियुष इन हे अंबेजोगाई येथील हॉटेल कोणाचे आहे? .याची चौकशी व्हायला हवी. अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात हे पूर्वी नाशिकला होते. त्यानंतर परत बड्या व्यक्तीच्या आशिर्वादामुळे त्यांची बदली बीडला झाली.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

अंबेजोगाई येथील हॉटेल पियुष इन होटल कोणाचे आहे ? मला अशी माहिती मिळतेय की, डॉ अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिव्हिल रुग्णालयाच सर्जन आहेत, याची चौकशी व्हायला हवी.

संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन झाले.

वाल्मिक कराडला दोनदा रुग्णालयात आणण्यात आले.

11 रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मधे ठेवण्यात आले.

हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आत्ता मोठ्या आशिर्वादाने पुन्हा बीडमध्ये आगमन झाले आहे.
 
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , या संदर्भामध्ये डॉ.अशोक थोरात यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता मी 21 तारखेपासून 31 तारखेपर्यंत रीतसर रजेवर आहे. माझा आणि वाल्मिक कराड यांच्या उपचाराचा काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group