नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कामास असलेल्या तरुणीचा एका अंडे विक्रेत्याने विनयभंग केल्याची घटना जय भवानी रोड परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी तरुणी दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास तिच्या व्यक्तिगत कामासाठी जय भवानी रोड परिसरात आली होती. तेथे अंडे विक्रेता असलेला आरोपी राजभूषण हिरामण बागूल हा तिच्या कारच्या आसपास फिरत होता. नंतर ही तरुणी कामानिमित्त उपनगर परिसरात गेली होती.
ती काम आटोपून कारजवळ आली असता राजभूषण बागूलने तिच्याजवळ येत तिचा उजवा हात पकडला. “तुझी तब्येत बरी आहे का?” असे विचारून त्याने स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. विशेष म्हणजे आरोपी हा विवाहित आहे.
तरुणी घाबरल्याने ती तेथून कोणास काही न सांगता घरी निघून गेली. तिने झालेला सर्व प्रकार पतीला सांगितला. दि. 2 डिसेंबर रोजी ती नेहमीप्रमाणे नोकरीस असलेल्या बँकेत आली असता सकाळी राजभूषण पुन्हा बँकेसमोर दिला. त्यावेळी तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांना सांगितला.
अखेर तिने बागूलविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद शेजवळ करीत आहेत.