Nashik Crime : रस्त्यावर वाढदिवसाचे १५ केक कापणे पडले महागात; दहशत निर्माण करणार्‍या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल
Nashik Crime : रस्त्यावर वाढदिवसाचे १५ केक कापणे पडले महागात; दहशत निर्माण करणार्‍या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर

नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवसाचे 15 केक मोठ्या टेबलावर ठेवून ते कापल्यानंतर आरडाओरडा करीत धुडगूस घालणार्‍या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित महेश संभाजी देवरे या इसमाचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाला 13 ते 14 इसम एकत्र आले. त्यांनी वाढदिवस शांततेत साजरा न करता सिडकोतील तानाजी चौकात सार्वजनिक मैदानाच्या बाजूला रस्त्यावर मोठा टेबल लावून त्यावर 15 केक एकत्र ठेवले.

त्यानंतर शांततेचा भंग करीत या टोळक्याने वाढदिवस साजरा केला; मात्र या टोळक्याने आरडाओरडा करून फटाक्यांची आतषबाजी करीत येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने ज्योत पेटवून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अंबड पोलिसांच्या पथकाने याबाबत तपास केला. या प्रकरणी महेश संभाजी देवरे, विजय संजय पालकर, सचिन वाल्मीक पाटील, गणेश धोंडू पारसकर, रोशन लक्ष्मण देवरे, सचिन अविनाश देवरे, रोशन रावसाहेब पाटील, दर्शन तळेले, मिलिंद जाधव व इतर पाच अज्ञात इसम अशा 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस अंमलदार सूचितसिंग सोळुंके यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस अंमलदार पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group