18 हजार रुपयांची लाच मागून पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकासह एका खाजगी इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
विजय भास्कर पाटील (वय 51, रा. खानापूर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव) व भास्कर रमेश चंदनकर (वय 43, रा. खानापूर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव) असे लाच घेणाऱ्या इसमांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या वडिलांवर दारूबंदी कायद्यान्वये यापूर्वी कारवाई करण्यात आलेली आहे. त्यानंतर दारूबंदी कायद्याचे कलम 93 प्रमाणे कारवाई न करण्यासाठी आरोपी दुय्यम निरीक्षक विजय पाटील हे तक्रारदार यांच्याकडे 12 हजार रुपये लाचेची मागणी करत होते. त्यामुळे तक्रारदाराने जळगावच्या लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे दिनांक 17 डिसेंबर रोजी लेखी तक्रार दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता आरोपी विजय भास्कर पाटील आणि चालक रमेश चंदनकर यांनी तक्रारदाराकडून कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दीड हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे बारा महिन्यांचे एकूण 18 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याचा पहिला हफ्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना चालक भास्कर रमेश चंदनकर यांना रंगेहात पकडण्यात आले.
दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.