नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पतीने पत्नीचा बुटाच्या लेसच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना रामकुंडाजवळ आज सायंकाळी घडली.
शीतल नितीन भामरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत निशा भामरे ही पती नितीन भामरे व सासू-सासरे यांच्या समवेत रामकुंडाजवळील ढिकले वाचनालय जवळ एका पत्राच्या घरात राहते.
तिच्या उत्पन्नावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. नितीन भामरे हा मद्यपी असल्याने तो नेहमी नशेच्या आहारी असतो. त्यांचे अनेक वेळेला वाद होत असत. आज दुपारच्या सुमारास घरी कोणी नसताना नितीन ने बुटाच्या लेसने निशाचा गळा आवळून तिचा खून केला. नंतर तो घराची कडी बाहेरून लावून तिथून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख ,पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फरार झालेल्या नितीन चा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे.