वाल्मिक कराडच्या अडचणींत वाढ , 'त्या' जबाबाने वाढवली चिंता
वाल्मिक कराडच्या अडचणींत वाढ , 'त्या' जबाबाने वाढवली चिंता
img
वैष्णवी सांगळे
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा देखील वाल्मिक कराडवर आरोप आहे. या प्रकरणात देखील वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती, त्यांच्या हत्या प्रकरणाला आता दोन वर्ष उलटून गेले आहेत. या प्रकरणात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्ह आणि विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा गोपनीय जबाब नोंदवण्यात आला आहे. १६४ नुसार विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा जबाब या प्रकरणात महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बांगर यांनी या प्रकरणात दिलेल्या जबाबामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचं देखील नाव घेतल्याची माहिती समोर येत आहे.  यामुळे हा जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, यामुळे आता वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच या प्रकरणातील दोन संशयितांची नार्को टेस्ट देखील होत आहे. यातून आता एसआयटीच्या हाती नेमकं काय लागतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group