२५ एप्रिल २०२६
ज्या वेळेस एखादी तरूणी लग्न बंधनात अडकते तेव्हा त्या प्रत्येक तरूणीला वटते की, लग्नानंतर आपला संसार आनंदाने आणि सुखाने सुरू रहावा पण कधी कधी हे या सुखला काही महिला या मुकतात कही महिलांच्या वाट्याला आनंदी संसाराचे सुख तेत नाही.
असचं एका विवाहित महिलेसोबत घडलं आहे. यात तिला स्वत:चा जीव गमवावा लागला आहे. ठाण्यातील एका शांत परिरात घडलेल्या या धक्कादायक घटनेने रहिवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाचपाखाडी टेकडी बंगला या भागात एका महिलेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
संसाराच्या सुरुवातीलाच नशिबात आलं 'हे' भयाण वास्तव
मिळालेल्या माहितीनुसार, हिमा खडका (वय26) असे मृत महिलेचे नाव असून ती तिच्या पती नरेशसोबत गेल्या काही काळापासून आगाखान वाडी परिसरात वास्तव्यास होती. शुक्रवारी साधारण दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान तिचा मृतदेह हा घरात आढळून आला. या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.
सध्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार,सकाळी साधारण 10 वाजण्याच्या दरम्यान पतीने तिचा गळा आवळून खुन केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमागील नेमके कारण अजूनही अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी सध्या घराची पाहणी करत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शेजाऱ्यांनीही या घटनेबाबत धक्का व्यक्त केला आहे.मुख्य म्हणजे हिमा आणि तिच्या नवऱ्यामध्ये काही वाद होता का याचाही पोलिस तपास करत आहेत. सध्या या प्रकरणी नौपाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून आरोपी पतीविरोधात कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
Copyright ©2026 Bhramar