खळबळजनक! नात्यातील विश्वासाला तडा देणारी घटना; काकाकडून अल्पवयीन पुतणीचा विनयभंग
खळबळजनक! नात्यातील विश्वासाला तडा देणारी घटना; काकाकडून अल्पवयीन पुतणीचा विनयभंग
img
दैनिक भ्रमर

पुणे:  एका २६ वर्षीय काकाने आपल्याच अल्पवयीन पुतणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरात घडला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने तपास चक्र फिरवत आरोपी काकाला सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. कुर्डुवाडी परिसरातून त्याला अटक करण्यात आली. नात्यातील विश्वासाला तडा देणाऱ्या या घटनेन पुणे शहर हादरले आहे.



नेमकी घटना काय

पीडित मुलगी ही पुण्यात आपल्या कुटुंबासह राहते आणि महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी काका दोन वर्षांपूर्वी तिच्या घरी वास्तव्यास होता, त्यानंतर तो आपल्या मूळ गावी कुर्डुवाडी येथे निघून गेला होता. मात्र, १० एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास जेव्हा मुलगी महाविद्यालयातून घरी परतत होती, तेव्हा काकाने तिचा पाठलाग केला. त्याने तिला वाटेत अडवून तिचा विनयभंग केला.

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झाला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्याला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group