कौटुंबिक वादाचा धक्कादायक अंत: चारित्र्यावर संशय घेऊन जावेचा छळ करणाऱ्या महिलेला पुणे न्यायालयाची शिक्षा!
कौटुंबिक वादाचा धक्कादायक अंत: चारित्र्यावर संशय घेऊन जावेचा छळ करणाऱ्या महिलेला पुणे न्यायालयाची शिक्षा!
img
नितीशा कुलकर्णी




कुटूबं म्हटले की वाद हे होतातच पण आजकाल ते वाद इतक्या टोकाला पोहोच आहेत की, त्याचे परीणाम थेट एखाद्या व्यक्तिच्या जिवावर बेततात. पुण्यातून अशिच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात कौटुंबिक वादातून आणि चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक छळ केल्यामुळे थोरल्या जावेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पुणे न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

धाकटी जाऊ मंगल सचिन अडागळे (वय ३०, रा. लोणी काळभोर) हिला न्यायालयाने ३ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी हा निकाल दिला.

नेमकी घटना काय?

लोणी काळभोर येथील रहिवासी असलेल्या मीना सुरेश अडागळे यांनी सप्टेंबर २०११ मध्ये आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तपासादरम्यान पोलिसांना मीना यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली होती. या चिठ्ठीत त्यांनी आपली धाकटी जाऊ मंगल हिच्या मानसिक छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. सुसाईड नोट ठरली 'गेम चेंजर' या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी बाजू मांडताना सांगितले की, आरोपी मंगल ही मृताच्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि त्यावरून तिला सतत मानसिक त्रास देत असे.

मृताने मरण्यापूर्वी लिहिलेली ती चिठ्ठी या खटल्यात सर्वात मोठा कायदेशीर पुरावा ठरली. हस्तलिखित पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने मंगलला दोषी ठरवले. सहा जणांची निर्दोष मुक्तता याच प्रकरणात अन्य ६ जणांवरही आरोप करण्यात आले होते, मात्र पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. केवळ मुख्य आरोपी मंगल हिच्यावर आरोप सिद्ध झाल्याने तिला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group