मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरात घरफोडी , मध्यरात्री...
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरात घरफोडी , मध्यरात्री...
img
वैष्णवी सांगळे
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बीडमधील अनेक सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हे हत्याकांड संपूर्ण देशात गाजले होते. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक ठिकाणी लोक रस्त्यावरही उतरले होते. अशातच आता पुन्हा एकदा मस्साजोग चर्चेत आले आहे.

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्यासह गावातील अनेकांच्या घरी घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री घरात दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना हा प्रकार घडला आहे. सकाळी उठल्यानंतर हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. 

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप ? 'ऑपरेशन टायगर' बाबत एकनाथ शिंदे यांचं थेट उत्तर, म्हणाले उबाठाचे खासदार...

माहितीनुसार मस्साजोग गावात मध्यरात्री चोरट्यांनी धनंजयदेशमुख यांच्या घरासह अनेक ठिकाणी घरफोडी केली तर तलावाच्या परिसरात असलेले कॉपर केबल चोरून नेले आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आला आहे. केज पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक, श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम देखील मस्साजोग परिसरात दाखल झाली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मस्साजोग मध्ये पोटनिवडणूक पार पडत आहे. ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. अत्यंत साधेपणाने भावनिक वातावरणात त्यांनी केजच्या तहसील कार्यालयात आपला उमेदवारी नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला.


इतर बातम्या
Join Whatsapp Group